कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे मार्गावर इंजिन घसरले

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, रेल्वे मार्गावर इंजिन घसरले

Published by :
Published on

कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून अपघात झाला आहे. करबुडे बोगदयामध्ये आज पहाटे ०४.१५ वाजता दरड कोसळल्याने हा अपघात झाला. रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत . या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही .मात्र अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे .मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत.

सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com