संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज

संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज

अग्निशमन विभागाची पंचगंगा नदीत शोध व बचावाची प्रात्यक्षिके
Published on

सतेज औंधकर | कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून बुधवारी पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर झाली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समोर केले.

संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज
कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; ज्यांचा गौरव आपण देश की बेटियॉं...

यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपायोजना आणि नियोजन करते. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्स, कोणतेही आपत्ती आली तर त्याला सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.

नदीमध्ये प्रात्यक्षिक दरम्यान अग्निशमन विभागाकडे असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व दोरच्या सहाय्याने कसे वाचवले जाते याचेही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स संस्थेकडील स्वंयसेवकांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com