महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

Published by :
Published on

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. तर शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता आहे.

मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.

दुसरीकडे शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. 'मी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा निषेध व्यक्त करत आणि सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला आहे', असं ट्विट करत शेलार यांनी पत्राबाबत माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com