Aryan Khan Case | किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

Aryan Khan Case | किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

Published by :
Published on

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच असलेला के. पी. गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.

किरण गोसावीची एक तास कसून चौकशी केल्यानंतर तो कुठे कुठे लपला होता याची माहिती मिळाल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. गोसावी हा पुणे, मुंबई, लोनावळा, जळगाव, उत्तर प्रदेशातील फत्तेपूर, लखनऊ, तेलंगनातील हैदराबाद आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लपून बसला होता. आज पहाटे 3 वाजात कात्रजमधील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली, असं गुप्ता यांनी सांगितलं.

के. पी. गोसावीवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाने पैसे लुबाडल्याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. तेव्हापासून गोसावी फरार होता. अखेर पुणे पोलिसांनी आज पहाटे त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आज त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com