किडनी तस्करांना पोलीस पाठीशी घालतेय; तस्करीला बळी पडलेल्या महिलेचा आरोप
चंद्रशेखर भांगे, पुणे | लोकशाही न्यूजने (Lokshahi Impact) काही दिवसांपुर्वीच पुण्यातील किडनी रॅकेटचा (Kidney racket) गोरखधंदा उघड केला होता. यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत, या प्रकरणात लक्ष घातलं होते. आज या घटनेला 25 दिवस उलटून गेले होते. मात्र किडनी तस्करीला बळी पडलेली सारीका सुतार अद्याप न्यायापासून वंचित आहे. त्यामुळे किडनी तस्करांना (Kidney racket) पोलीस पाठीशी घालतेय, पोलिस गरीबांच्या नाही तर श्रीमंतांच्या पाठीशी, असा आरोप सारीका सुतार यांनी केला आहे. दरम्यान 25 दिवस उलटून सुद्धा या प्रकरणात पोलिसांनी एकाही आरोपीला अटक न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूरच्या सारिका सुतार ह्या विधवा महिलेची 15 लाखाचं आमीष दाखवून खोटे दस्तावेज बनवून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये बेकायदेशीरपणे किडनी काढण्यात आली. यानंतर किडनी तस्कराने (Kidney racket) महिलेची फसवणूक करत पळ काढला होता. लोकशाही न्यूजने (Lokshahi Impact) या संदर्भात सर्वप्रथम बातमी करत हे रॅकेट उघड केले होते. मात्र या घटनेला आज जवळपास 25 दिवस लोटून गेली. मात्र अजुनही सारिका सुतार हिला न्याय मिळाला नाही. त्यामुळे सारिकाने आज अक्षरशहा पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचा उंबरठा गाठलाय.
राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग नेमकं करताय काय ? असा प्रश्न सारिका सुतार यांना पडला आहे. मी किडनी तस्कर रविभाऊ आणि रुबी हॉल क्लिनिक विरोधात तक्रार देऊनही, अजूनही साधा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याचबरोबर रवी भाऊला पोलिसांनी साध चौकशीसाठी देखील शोधलं नाही. त्यामुळे या किडणी तस्करी प्रकरणात पोलीस विभाग नेमक कुणाला पाठीशी घालत आहे ? असा प्रश्न सारिका सुतार यांनी उपस्थित केला आहे.
सारिका सुतार किडनी तस्करी प्रकरणात पोलिसांनी तातडीने किडनी दलाल रविभाऊला अटक करावी आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सारिका सुतारची बहिण कवीता कोळी यांनी केली आहे