खडसें सहकार्य करत असतील तर अटक करण्याची काय गरज? हायकोर्टाचा ईडीला सवाल

खडसें सहकार्य करत असतील तर अटक करण्याची काय गरज? हायकोर्टाचा ईडीला सवाल

Published by :
Published on

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. जर खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर, त्यांना अटक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न न्यायालयाने ईडीला विचारला आहे.

एकनाथ खडसेंनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत आपल्यावर नोंदविला गेलेला इसीआयआर रद्द करणे तसेच सुनावणी होईपर्यंत तपास यंत्रणांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने द्यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने खडसेंना दिलासा दिला आहे.

एकनाथ खडसे यांना उच्च न्यायालयात होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याने 8 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. त्यानंतर पुढील सुनावणीवर बोलत असताना न्यायालयाने पुन्हा एकदा खडसेंना दिलासा दिला आहे. समन्स व विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खडसे योग्य प्रतिसाद देत आहेत. मग त्यांना अटकेची भिती का वाटते? असा प्रश्न उच्च न्यायालयाने ईडीला विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com