सिंधुदुर्गच्या जंगलात 'जम्पिंग स्पायडर'च्या नवीन जातीचा शोध!

सिंधुदुर्गच्या जंगलात 'जम्पिंग स्पायडर'च्या नवीन जातीचा शोध!

निसर्गरम्य कोकणात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे नेहमीच नवनवीन पशु-पक्षी व प्राणी, कीटक, जलचर यांचा शोध लागतो.
Published by :
Team Lokshahi
Published on

रोहन नाईक | सिंधुदुर्ग : निसर्गरम्य कोकणात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे नेहमीच नवनवीन पशु-पक्षी व प्राणी, कीटक, जलचर यांचा शोध लागतो. त्यामुळेच ही भूमी पर्यावरण अभ्यासकांना नेहमीच भुरळ घालत आली आहे.

सिंधुदुर्गच्या जंगलात 'जम्पिंग स्पायडर'च्या नवीन जातीचा शोध!
राहुल गांधी वक्ते होऊ शकत नाही; वडेट्टीवारांच्या विधानावर बावनकुळेंचा निशाणा, म्हणाले...

सिंधुदुर्गच्या जंगलात जम्पिंग कोळ्याची नवीन प्रजाती आढळून आली आहे. ही प्रजाती सिंधुदुर्गच्या जंगलात आढल्यामुळे या प्रजातीस स्पारम्बाबस सिंधुदुर्ग असे नाव देण्यात आले आहे. कोळ्याच्या या प्रजातीचा शोध कुडाळ तालुक्यात लागला असून, वेताळ बांबर्डे येथील वन्य प्राणी अभ्यासक गौतम कदम यांनी लावला आहे. यासाठी त्यांना केरळमधील काही वन्यप्राणी अभ्यासकांची मदत मिळाली. चीन आणि मलेशियामध्ये या प्रजातीची नोंद झाली होती. भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद असल्याची माहिती गौतम कदम यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com