महाराष्ट्र
Konkan Flood | “तळीये गावातील घरं म्हाडा बांधणार”
महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर जवळ जवळ संपूण गावच नष्ट झालं आहे. परंतु आता म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा नव्याने गाव वसवण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली. त्यानुसार जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहे, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी नेमकी किती घरे होती, उद्यान होते का?, मंदिर, मस्जिद, दवाखाना आदींसह काय काय होते, याची माहिती येत्या काही दिवसात घेतली जाणार आहे.
शोधकार्य थांबल्यानंतर तसेच पावसाने उसंत घेतल्यानंतर म्हाडाच्या माध्यमातून येथील पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार त्याची रुपरेषा ठरवून येथे पुन्हा तळीये गाव नव्याने उभारले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.