मंत्री जयंत पाटलांकडून पवारांसाठी करेक्ट बाराच्या ठोक्याला ट्विट

मंत्री जयंत पाटलांकडून पवारांसाठी करेक्ट बाराच्या ठोक्याला ट्विट

Published by :
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करेक्ट बाराच्या ठोक्याला ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचा आधारवड, आमच्या सर्वांच्या जीवनातील सूर्य आदरणीय शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे ट्विट करत असताना मंत्री जयंत पाटील यांनी पवारांसोबतचे जुने फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तसेच अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत तर शरद पवारांनी फार कमी वयात जयंत पाटील यांना अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पक्षाचा पडता काळ असतानाही शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. जयंत पाटील यांनीही जबाबदारी पेलत पक्षाची संघटना बळकट करण्याचं काम हाती घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com