“अनिल देशमुखांवरील कारवाई ही राष्ट्रवादीची बदनामी करण्यासाठीच”

“अनिल देशमुखांवरील कारवाई ही राष्ट्रवादीची बदनामी करण्यासाठीच”

Published by :
Published on

राष्ट्रवादीची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात व्यवसायिकांनी तक्रारी केल्या. वाझे दमदाटी करत आहेत. त्याच्या काही टेप रेकॉर्ड सुद्धा झाले आहे. अनिल देशमुख हे एक नंबर नाहीत, पोलीस दलातील प्रमुख आहेत, हे स्पष्ट झाल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

त्यामुळे अनिल देशमुख यांना दोषी धरणे योग्य नाही. राष्ट्रवादीची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांचा यामध्ये कोणताही संबध नाही, असे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com