महाराष्ट्र
Jayant Patil : 'सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागेल त्यात नवीन नाही'
शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले आहे, असे असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक विधान केले आहे. शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही.
शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळं शिवसेना आता काय निर्णय घेणार पाहु असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.
मात्र चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं विधानही त्यांनी केलं आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, त्यांनी अंतर्गत चर्चा आणि विचार करुन केलं असेल त्यामुळे सध्या वेट आणि वॉच या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.