“पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल”

“पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल”

Published on

महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल,असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. संभाव्य पूराच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. सांगलीमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या आपत्ती यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सांगलीवाडी येथील मराठा बोट क्लबच्यावतीने "जयंत रेस्क्यू फॉर्स"ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून पूर परिस्थितीमध्ये बचाव काम करण्यात येणार आहे.या पथकाचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज पार पडला आहे.या वेळी मंत्री जयंत पाटील यांनी बोटीतून कृष्णा नदीच्या पात्रात फेरफटका मारत पाहणी केली. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्र मध्ये पूर येतो,त्याचा फटका सांगली,कोल्हापूर, सातारया बरोबर कर्नाटक राज्यालाही बसतो, त्यामुळे याबाबत दोन्ही राज्याचा समन्वय असावा यासाठी बैठक घेतली,कर्नाटक राज्याने चांगला प्रतिसाद दिला आहे.त्याच बरोबर गेल्या वर्षी पूर कसा कमी येईल याबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवून प्रयत्न केला आणि आता महाराष्ट्र सरकारने यामध्ये आणखी सुधारणा करत धरण क्षेत्रात आधुनिक पर्जन्यमापक यंत्रणा कार्यान्वित केली आहे ज्यामुळे धरणात किती पाणी असेल नदी पात्रात किती पाणी असेल याचा अचूक अंदाज येईल, त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या वतीने नदीकाठच्या प्रत्येक गावांना त्याची पातळी वाढल्यास पाणी कुठे पर्यंत येऊ शकेल याचे नकाशे दिली आहेत.तसेच कोणतेही संकट आले,तर हे सरकार झोकून देऊन काम करेल,असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com