महाराष्ट्र
सांगली | दुष्काळी जत तालुक्यातील महिलांचे जयंत पाटलांसोबत रक्षाबंधन
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना राखी बांधत औक्षण केले आहे. दरम्यान, हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक असून या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले.
गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याची ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरुपी सिंचनाखाली आणण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी घेतला.
जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्यादृष्टीने जयंत पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याने तालुक्यातील जनता समाधानी आहे.