जळगावात राष्ट्रवादी व शिवसेनेचा वाद उफाळला

जळगावात राष्ट्रवादी व शिवसेनेचा वाद उफाळला

Published by :
Published on

जळगावात राष्ट्रवादी व शिवसेनेचा वाद उफाळून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी पार पडले मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला केला असून याविरोधात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत 24 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहीनी खडसे खेवलकर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे .

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते त्या नुसार अवैध धंदे बंद होत असल्याने आमदारांनी जाणिवपूर्वक आरोप केल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com