पोटाची खळगी भरण्यासाठी जन्मदात्या आईनेच अडीच वर्ष मुलाला विकले
मंगेश जोशी | जळगाव : परिस्थिती व पोटाची खळगी भरण्यासाठी नियती कोणती वेळ आणेल हे सांगता येत नाही . त्यामुळे व्यक्ती कोणत्या थराला पोहचू शकतो याचे एक धक्कादायक उदाहरण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पाहिला मिळाले. कोरोना काळात पतीचे निधन झाल्याने एक दोन नव्हे तर तब्बल सात मुलांचे पालन पोषण करण्यासाठी एका महिलेला चक्क भिक मागण्याची वेळ आली असून मात्र भिक मागूनही सात मुलांचे पोट भरू नये अखेर या महिलेने तिच्या सात पैकी एका अडीच वर्षाच्या मुलाला 15 हजारात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे या महिलेच्या अजूनही इतर दोन मुलांच्या विक्रीचाही व्यवहार सुरू होता. त्यात एक मुलगा अठरा हजाराला व एक मोठी मुलगी 25 हजार रुपयाला हा व्यवहार होणार होता मात्र याबाबत अमळनेर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस सतर्क होऊन घटनास्थळी पोहोचल्याने इतर दोन मुलांचा व्यवहार ठरवला आहे. तर पंधरा हजार रुपयात विक्री केलेल्या अडीच वर्षाच्या मुलाचा देखील पोलिसांनी तातडीने शोध घेऊन मुलाला सुखरूप परत मिळवले आहे.
पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता महिलेच्या शब्दांनी पोलीसही भरावले
सदर प्रकारानंतर अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी याबाबत महिलेची चौकशी केली असता या महिलेची करून कहाणी समोर आली आहे. कोरोना काळात पतीचे निधन झाले त्यातच एकापाठोपाठ सात मुलांचा जन्म झाला. ना रोजगार ना हाताला काम त्यामुळे भीक मागून मिळेल ते खाऊ घालून मुलांचे पोट भरण्यासाठी प्रयत्न करते मात्र याची खळगी भरत नसल्याने अखेर ना इलाज असतो ज्याला गरज आहे त्याला बाळ देऊन टाकलं दिवसभर रस्त्यावर भटकून भीक मागून सुद्धा पोटाची खळगी भरत नसेल तर मी तरी काय करू अशा करून शब्दात या महिलेने आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली.
मात्र सदर महिलेने केलेले कृत्य हे बेकायदेशीर असून याप्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या सातही मुलांची बालसुधारगृहात परवानगी केली असून सदर महिलेला अशादिप शासकीय महिला वसतिगृहात दाखल केले आहे. दरम्यान अशा पद्धतीने बालकांना त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेणे हे बेकायदेशीर असून असा प्रकार केल्यास त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला आहे.