जळगाव महापालिका सभेत राडा; भाजप नगरसेवकांची उपमहापौरांना धक्काबुक्की
मंगेश जोशी, जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला. सकाळी अकरा वाजता महासभा सुरू झाल्यानंतर महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील हे व्यासपीठावर बसल्याने यावर भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आक्षेप घेतला व यावरून दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. इतरांनी मध्यस्थी केल्यानतंर तेव्हा हा वाद मिटला. मात्र, सभेच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना एका प्रस्तावाच्या मतदानात उपमहापौरांनी खाडाखोड केल्याच्या आरोप करीत भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे व्यासपीठावर धाऊन जाताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात उपमहापौर पाटील यांना धक्काबुक्की झाली आणि ते खुर्चीवर पडल्याने खळबळ उडाली.
तर महासभेत विविध विषयांवर कामकाज झाल्यानंतर मतदानाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात तुफान गदारोळ झाल्याने भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह भाजपच्या इतर नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर जाऊन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या कृतीचा विरोध केला. हो यावेळी भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे उपमहापौर यांच्यात धक्का बुक्की झाली. महासभेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी राष्ट्रगीताच्या वेळी गदारोळ केल्याचा आरोप भाजपच्या महिला नगरसेवकांनी केला असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपच्या महिला नगरसेवकांनी व्यासपीठासमोर या मांडून उपमहापौर यांचा निषेध व्यक्त केला.