जळगावमध्ये महावितरण कार्यालयात तोडफोड

जळगावमध्ये महावितरण कार्यालयात तोडफोड

Published by :
Published on

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शिवसेनेच्या आंदोलनानंतर अज्ञात 7 ते 8 जणांनी केली महावितरण कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये कार्यालयातील अभियंत्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तींना समजावण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने कर्मचाऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान कर्मचाऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . गजानन राणे असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

पाचोरा – भडगाव तालुक्यात आज शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयास ताळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. आंदोलना नंतर अज्ञात व्यक्तींनी केली भडगाव येथील चाळीसगाव महावितरण कार्यालयात तोडफोड केली असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com