Jalgaon District Bank elections | एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत ? निवडणूक एक विचारानं करण्याचा सूर

Jalgaon District Bank elections | एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत ? निवडणूक एक विचारानं करण्याचा सूर

Published by :
Published on

मंगेश जोशी, जळगाव | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या कट्टर विरोधकांच्या मध्ये आज पुन्हा एकदा बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये निवडणूक एक विचारानं करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया खडसे ,महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आगामी काळात जळगाव जिल्हा बँकेचे निवडणूक होऊ घातली आहे. शेतकरी आणि सहकाराचा विचार करता जिल्हा बँक ही राजकारण विरहित रहावी यासाठी मागील काळात तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन पॅनल तयार करून निवडणूक राजकारण विरहित करण्याचा प्रयत्न केला होता.त्यात चांगलं यश मिळाले असल्याने आताची निवडणूक ही तशाच पद्धतीने व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्हा बँकेच्या हिताचा विचार करता ही निवडणूक ही सर्वच पक्षांना सोबत घेऊन एक विचाराने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच निमित्ताने जागा वाटप संदर्भात गिरीश महाजन,एकनाथ खडसे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आ सुरेश भोळे आ शिरीष चौधरी,आ किशोर अप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक आज जळगाव शहरात शासकीय निवास्थानी पार पडली. एक दुसऱ्या जागेचा तिढा वगळता एक विचारानं ही निवडणूक होण्यात कोणतेही अडचण नसल्याचे प्रतिक्रिया एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com