जळगाव जिल्हा बँक निवडणुक; खडसे विरुद्ध खडसे लढत होणार

जळगाव जिल्हा बँक निवडणुक; खडसे विरुद्ध खडसे लढत होणार

Published by :
Published on

मंगेश जोशी, जळगाव | जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन भाजप खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या तथा जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुक; मविआचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय पॅनल च्या माध्यमातून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता व त्यासाठी जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी हे एकत्रित आले होते.

पहिल्या झालेल्या बैठकीत सर्व पक्ष हे सकारात्मक होते मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसा अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याविरोधात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना निवडणुकीत उतरावे लागले. त्यामुळे खडसे विरुद्ध खडसे अशी लढत देखील जिल्हा बँकेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही 8 नोव्हेंबर आहे.या काळात कोण कोणा सोबत युती करणार ? की पुन्हा राजकीय वैरी एकत्रित येणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com