ITI Admissions | आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर
अकरावी प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला असतानाच आता आयटीआय प्रवेशाचा प्रश्नहि सुटला आहे. राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशासंदर्भातील अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयटीआय प्रवेशाची पहिली यादी पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच्या आठवड्यात म्हणजेच 6 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे, तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आतापर्यंत 1 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज दाखल केले असून 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपर्यंत ही संख्या 2 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
संपर्क साधण्याचे आवाहन
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक शंका असल्यास विद्यार्थ्यांनी नजिकच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवाराला प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही माहितीमध्ये बदलही करता येणार आहे.
वेळापत्रक
- ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व अर्जामध्ये दुरुस्ती करणे – 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे – 31 ऑगस्ट
- प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी -2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता
- गुणवत्ता यादीसंबंधी हरकती तसेच प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल – 2 सप्टेंबर
- संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची तारीख व वेळ – 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता
- पहिली प्रवेश फेरी – 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता