ISEC Result : आयएसईसी परीक्षेत पुण्यातील हरगुण माथरू देशात पहिली

ISEC Result : आयएसईसी परीक्षेत पुण्यातील हरगुण माथरू देशात पहिली

सीआयएसईसी परिक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : सीआयएसईसी (CISEC) घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, पुण्यातील सेंट मेरीज स्कूलमधील हरगुण कौर माथरू (Hargun Kaur Matharu) ही देशात पहिली आली आहे.

ISEC Result : आयएसईसी परीक्षेत पुण्यातील हरगुण माथरू देशात पहिली
राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; कोण मारणार बाजी द्रौपदी मुर्मू का यशवंत सिन्हा

सीआयएसईसी घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या इयत्ता दहावी परीक्षेत ९९.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने ९९.८० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. यात पुण्याच्या सेंट मेरीज स्कूलमधील हरगुण कौर माथरू हिचा समावेश आहे.

ISEC Result : आयएसईसी परीक्षेत पुण्यातील हरगुण माथरू देशात पहिली
CM शिंदेंचा एक फोन अन् बिहारमध्ये अपघाताग्रस्त मराठी कुटुंबाला आणायला गेले विमान

पहिल्या सत्रातील परीक्षेतील गुण पाहून आपल्याला चांगले गुण मिळतील, असे वाटत होते. परंतु, संपूर्ण देशात आपण पहिले येऊ, असे कधीच वाटले नाही. पण देशात पहिला क्रमांक आल्याचा खूप जास्त आनंद वाटत आहे. कोरोना काळातही शाळेने ऑनलाइनद्वारे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आता विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले आहे. त्यातही अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र शाखेत पुढील शिक्षण घेण्याचा विचार आहे, असे हरगुण कौर माथरूने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com