IRCTC
IRCTCTeam Lokshahi

Indian Railways: IRCTC च्या नियमात मोठा बदल, आता तिकीट बुकींग करतांना...

पुर्वी करता येत होती 12 तिकिटांचे बुकींग आता मर्यादा केली दुप्पट
Published by :
Team Lokshahi
Published on

रेल्वेने प्रवास (Indian Railways)करणाऱ्या प्रवाश्यांसाठी भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केला आहे. या बदलानंतर आता रेल्वे प्रवासी एका महिन्यात त्याच्या खात्यावरुन 12 ऐवजी 24 ट्रेन तिकीट बुक करू शकतील. ही बुकिंग प्रक्रिया आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटद्वारे केली जाऊ शकते. परंतु यासाठी त्याला आधार लिंक करावे लागेल.

IRCTC
राज्यसभा निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख मतदान करणार का? कायदा काय सांगतो?

भारतीय रेल्वेने सोमवारी सांगितले की, प्रत्येक वापरकर्त्याने IRCTC आयडीने बुक करता येणार्‍या ऑनलाइन तिकिटांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी एक वापरकर्ता एका आयडीने एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकत होता, परंतु आता एक वापरकर्ता 24 तिकिटे बुक करू शकतो.

आधारकार्डची सक्ती

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हा फायदा फक्त त्या वापरकर्त्यांनाच मिळेल ज्यांनी आधार कार्ड IRCTC अॅपशी लिंक केले आहे. आधारशी लिंक केल्यानंतर या यूजर्सना आता 12 ऐवजी 24 ट्रेन तिकीट बुक करण्याची मुभा असेल. यासोबतच तिकिट बुक केलेल्या प्रवाशांपैकी एकाची आधारद्वारे पडताळणी करावी.

काय आहे सध्याचा नियम

सध्या, वापरकर्ता एका महिन्यात जास्तीत जास्त सहा तिकिटे IRCTC वेबसाइट आणि अॅपवर ऑनलाइन बुक करू शकतो, जी आधारशी लिंक नाही. त्याच वेळी, आधारशी लिंक केलेल्या सिंगल यूजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करता येतात. यासोबतच तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाला आधारची पडताळणी करणे आवश्यक आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com