Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट, बस सेवा सुरु

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट, बस सेवा सुरु

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले होते. राज्यभरात अनेक आंदोलनं सुरु होती. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती. एसटी बसेससुद्धा बंद करण्यात आल्या आहेत.

काल सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.

त्यानंतर आता बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा तसेच एसटी बस सेवा देखील पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com