नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना; अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले...
नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण केली जाणार आहे. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा निर्णय आहे.
याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख ट्विट करत म्हणाले की, व्वा, सुधीरभाऊ ! नागपुरात 100 एकर मध्ये फिल्म सिटी उभारण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतलात. तुमचं मनापासून अभिनंदन! यातून नागपूरमधील एका "व्हीलन" ला हक्काचे व्यासपीठ मिळेल. राहिला प्रश्न हिरो आणि हिरोईनचा ते आपण शोधूनच घेऊ. असे अनिल देशमुख म्हणाले.