सांगली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून शहरात तातडीच्या औषध फवारणीला सुरुवात

सांगली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून शहरात तातडीच्या औषध फवारणीला सुरुवात

Published by :
Published on

सांगलीतील पुराचे पाणी ओसरल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून शहरात तातडीच्या औषध फवारणीला सुरुवात झाली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार आरोग्य यंत्रणेने औषध आणि धूर फवारणीचे नियोजन केले आहे.

सांगलीत मंगळवारपासून पूर ओसरत चालल्याने पूर ओसारलेल्या भागात तातडीने औषध फवारणी केली जात आहे. यामध्ये गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, टिम्बर एरिया, शामराव नगर, कोल्हापूर रोड, गावभाग, फोजदर गल्ली यासह शहरातील अनेक पूर बाधित भागात महापालिकेच्या आरोग्य टीमकडून घरोघरी, गल्लोगल्ली औषध फवारणी केली जात आहे.

यामध्ये औषध धूर फवारणी बरोबर पावडर सुद्धा मारली जात आहे. ज्या ज्या भागातून पाणी कमी होईल तिथे तातडीने स्वच्छता आणि औषध फवारणी केली जाणार असल्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com