Bus Accident
Bus Accidentadmin

Photo : बस अपघातात 12 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत

इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे निघालेली एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. त्यात चालक-वाहकासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार जळगाव जिल्ह्यातील आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Madhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे निघालेली एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. त्यात चालक-वाहकासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये चार जळगाव जिल्ह्यातील आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधानांचे टि्वट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. बचावकार्य सुरू असून स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.

Bus Accident
Photo : बस अपघातात 12 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
admin

मुख्यमंत्री शिंदेकडून आदेश

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

admin

अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

admin

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

admin

जळगावात नियंत्रण कक्ष

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

एकही जिवंत निघाला नाही

खलघाट टोल नाक्यावरील महामार्ग रुग्णवाहिकेवर तैनात असलेला चालक श्रीकृष्ण वर्मा म्हणाला की, सकाळी 10.03 वाजता कंट्रोल रुममधून कॉल आला. त्यात पुलावरुन एक बस नदीत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर त्वरीत रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. परंतु नदीतून एकही व्यक्ती जखमी किंवा जिवंत निघाला नाही. बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे.

मृतांची नावे

1.चेतन राम गोपाल जांगिड (जयपूर, राजस्थान)

2.जगन्नाथ हेमराज जोशी (वय 70, मल्हारगढ उदयपूर, राजस्थान)

3.प्रकाश श्रवण चौधरी (वाहक, 40 अमळनेर, जळगाव)

4.निबाजी आनंदा पाटील (वय 60, अमळनेर)

5. कमला निंबाजी पाटील (वय 55, अमळनेर)

6.चंद्रकांत एकनाथ पाटील ( चालक, वय 45 , अमळनेर)

7. आरवा मुर्ताजा बोहरा (वय 27,मूर्तिजापूर, अकोला)

8.सैफुद्दीन ब्बास निवासी नूरानी (इंदूर)

9 अविनाश परदेशी,

10 राजू तुलसीराम - ३५,

11 लिम्बाजी खाती,

12 विकाश बेरहे - ३३,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com