अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, तळ कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

Published by :
Published on

राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात मागच्या एक आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र मुंबईत गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आज पुन्हा मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाल्याचं चित्र आहे. सकाळपासून मुंबईच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. हवामान तज्ज्ञ होसाळीकरांनी या संदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com