महाराष्ट्र
भाज्यांच्या दरात तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून बाजारातील आवक घटली आहे.
मुंबई : राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून बाजारातील आवक घटली आहे. याचा थेट परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला पाहायला मिळत आहे. पुणे, मुंबई यांसारख्या बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामन्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने भाजीपाला सडला आहे. यामुळे बाजारातील आवकही घटली आहे. याचा परिणाम म्हणून गवार, फ्लावर, शिमला मिर्ची, भेंडी, कोबी, वांगी अशा भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.