महाराष्ट्र
खिशाला लागणार महागाईची कात्री; गोकुळकडून दूध दरात वाढ
राज्यातील नागरिक आधीच महागाईमुळे हैराण झाले आहे. आता सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.
कोल्हापूर : राज्यातील नागरिक आधीच महागाईमुळे हैराण झाले आहे. आता सणासुदीच्या दिवसात मुंबईकरांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. दुधासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. दुधाच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळ महासंघाने घेतला आहे.
अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केल्यानंतर गोकुळने हा निर्णय घेतला आहे. म्हशीच्या दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २ रूपये तर गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर ३ रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता एक लिटर दुधासाठी आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळकडून दिपावली भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु, सर्वसामन्यांच्या खिशाला महागाईची झळ सोसवी लागणार आहे.