महाराष्ट्र
आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच; कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांशी संबंधित
राज्यात अनेक ठिकाणी आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित कारखान्यावर आयकर विभागावर धाड टाकली आहे. यामध्ये दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर शुगर,आणि नंदुरबारच्या पुष्प दंतेश्वर शुगर या चार कारखान्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या आहेत.
तर दौंड, बारामती, सातारा आणि नंदुरबारमध्ये या ठिकाणी ही आयकर विभागाने धाड टाकली असल्याची माहिती मिळत आहे.