साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा
शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण पूर्णत्वास आला आहे. साताऱ्यात आज शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखे प्रदर्शनात ठेवली जाणार आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थातून वाघनखांची मिरवणूक निघणार आहे.
या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. 19 जुलै म्हणजेच आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात होणार आहे.
शनिवार, दि. 20 जुलैपासून हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सर्व दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी 200 लोकांना पाहता येणार आहे. दिवसभरातून यासाठी चार स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये पहिला प्लॉट विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे.