पुण्यात निर्बंधाची ‘स्थिती जैसे थे’ असणार – दिलीप वळसे पाटील

पुण्यात निर्बंधाची ‘स्थिती जैसे थे’ असणार – दिलीप वळसे पाटील

Published by :
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे, अस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील.

निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दर वाढताना दिसत आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तूर्तास जे निर्बंध लागू आहेत तेच पुढे लागू राहतील, असं वळसे पाटील यांनी सांगितलं. तसंच शाळा- कॉलेज १५ जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं.

पुणे जिल्ह्यात लसीकरण वेगानं सुरु आहे. परदेशात तिसरी लाट फार वेगाने वाढलीय आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताहेत हे थांबलं पाहिजे. लहान मुलांना धोका जास्त असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे, असं वळसे- पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com