Helmet addiction mumbai
Helmet addiction mumbaiteam lokshahi

मुंबईत आता सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती

मुंबई पोलिसांनी दिली १५ दिवसांची मुदत, १५ दिवसांनी कारवाई सुरू करणार
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मुंबईत (mumbai) आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट (helmet) घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवह आयुक्तांनी दिले आहेत. परिवहन विभागामार्फत मुंबईत हेल्मेट सक्ती करण्यात आली. याची अंमलबजाणी सक्तीने होत असते. मुंबईत हेल्मेट न घातलेल्या व्यक्तींवर सतत कारवाई होत असते. आता यापुढे दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही (पिलियन) हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.

Helmet addiction mumbai
OBC Community : "महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही"

मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरणे बंधनकारक होणार अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसानंतर ही अंमलबजावणी होणार असल्याची वाहतूक पोलिसांनी परिपत्रक जारी केले. परिणामी हेल्मेट न वापरल्यास 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Helmet addiction mumbai
Maratha leader Abasaheb Patil : छत्रपती घराण्यापेक्षा उद्धव ठाकरे संजय राऊत शिवसेना मोठी नाही
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com