महाराष्ट्र
15 दिवसांत डोंबिवली पुन्हा भीषण स्फोटाने हादरली! MIDCमध्ये दोन कंपन्यांना लागली भीषण आग
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली. एमआयडीसी फेज- 2 मधील केमिकल कंपनीला पुन्हा आग लागली.
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली. एमआयडीसी फेज- 2 मधील केमिकल कंपनीला पुन्हा आग लागली. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी फेज 2 मध्ये एका कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, इंडो अमाईन्स कंपनीत भीषण आग लागली आहे.
एमआयडीसी मधील जवळपास असणाऱ्या नागरिकांनी सावध होऊन काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. आगीमुळे डोंबिवलीकरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. केमिकल कंपनीच्या गोदामामध्ये आग लागल्याची माहिती आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याची माहिती देखील समोर आली आहे.