घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; रेडिरेकनर आठ टक्के वाढणार?

घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; रेडिरेकनर आठ टक्के वाढणार?

महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2023-24 या वर्षात रेडिरेकनर दरात वाढ होण्याची शक्यता आहे
Published on

मुंबई : महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 2023-24 या वर्षात रेडिरेकनर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्यातील घरांच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोविड, लॉकडाऊन यामुळे राज्य सरकारने रेडिरेकनरच्या दरात वाढ केली नव्हती. परंतु, आता रेडिरेकनर दरात आठ टक्के वाढविण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; रेडिरेकनर आठ टक्के वाढणार?
उद्धवजी पुन्हा एकदा विचार करा; मुनगंटीवारांची खुली ऑफर, अजूनही काही बिघडलंलं नाही

सुत्रांनुसार, रेडिरेकनर दरात ग्रामीण, नगरपालिका क्षेत्र, महापालिका क्षेत्रात सरासरी आठ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या हा दर सात टक्के आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलसह इतर गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. तर, कर्जाच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आली आहे. यातच रेडिरेकनरमध्ये वाढ होणार असल्याने घरे आणि जमिनीच्या किमती आवाक्याबाहेर जाणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com