‘त्या’ स्पर्शामागे लैंगिक भावनाच, विशेष पॉक्सो न्यायालयाचा निर्वाळा

‘त्या’ स्पर्शामागे लैंगिक भावनाच, विशेष पॉक्सो न्यायालयाचा निर्वाळा

Published by :
Published on

महिलेच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श केला असेल तर तो लैंगिक हेतूनेच असला पाहिजे, असे पॉक्सो कायद्यात म्हटले आहे. त्यामुळे एका अल्पवयीन मुलीला केलेला 'त्या' स्पर्शामागे लैंगिक भावनाच होती, असा निर्वाळा पॉक्सो न्यायायाने दिला आहे.

अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. अल्पवयीन मुलीने कपडे घातलेले असताना मर्जीशिवाय तिच्या छातीला स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नसल्याचे खंडपीठाने म्हटले होते. याप्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

या पार्श्वभूमीवर एक असाच खटला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो न्यायालयात दाखल झाला होता. एका 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने मुलीच्या 'खासगी' भागाला स्पर्श केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यावर युक्तिवाद करताना आऱोपच्या वकिलाने गुगलचा हवाला दिला. गुगलवर पार्श्वभाग हा खासगी भाग असा अर्थ दिलेला नाही. त्यामुळे संबंधीत अल्पवयीन मुलीचा पार्श्वभाग हा खासगी भाग होत नाही, असे वकिलाने सांगितले.

मात्र, वकिलाचा हा यु्क्तिवाद फेटाळताना न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी पॉक्सो कायद्यातील कलम 7 ची व्याख्या अधोरेखित केली. महिलेच्या कोणत्याही अवयवाला स्पर्श केला असेल तर, त्यामागे लैंगिक हेतूच असणार, असे कलमात म्हटले आहे.. तसेच गुगलमध्ये या भागाचा अर्थ 'खासगी' असा केलेला नसला तरी, स्त्रीच्या कमरेखाली हात लावणे म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणे, असे भारतीय संस्कृती सांगते. याचाच अर्थ आरोपी तरुणाने लैंगिक भावना मनात ठेवूनच या मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचे सिद्ध होते, असे मत न्यायाघीशांनी नोंदवले आणि तरुणाला शिक्षा ठोठावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com