महाराष्ट्र
वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार
वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
टोल संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत समोरच्या काचेवर फास्टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसूल करावा असे त्यात सांगण्यात आले आहे.
वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग स्टिकर चिकटवत नाहीत. त्यामुळे टोल नाक्यांवर विनाकारण इतर वाहनांना वाट पाहावी लागते. त्यामुळे आता वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे.