मी अमित शाहांकडे तक्रार करणार – नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik ) यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. जसे अनिल देशमुख यांना अडकवलं तसे मलाही अडकवण्याच्या प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. असून याबाबत माझ्याकडे पुरावे देखील असल्याचं देखिल त्यांनी सांगितलं आहे.
नवाब मलिक म्हणाले, "दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिलीय. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं असता ते भाजपाशी संबंधित असल्याचं दिसत आहे." "काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची 'रेकी' करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या.
यासोबतच ते म्हणाले की, "जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे.