Student
Student Team Lokshahi

मार्क्स कमी मिळाले चिंता नको; 'या' प्रक्रियेने करा पुनर्मूल्यांकन

HSC Result 2022 : जाणून घ्या पुनर्मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया
Published on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2022) जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला असला तरी यंदा ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क्सचे प्रचंड टेंशन आले आहे. परंतु, या निकालात तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडले तरी काळजी करु नका. कारण बोर्ड तुम्हाला पेपर पुनर्मूल्यांकनाचा (Revaluation) ऑप्शन देते.

Student
यंदाही मुलींचीच बाजी! बारावीचा निकाल जाहीर

बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे. परंतु, कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा झाली असल्याने विद्यार्थ्यांना मार्क्सचे टेंशन आले आहे. अथवा कधी-कधी पेपर चांगला सोडवल्यानंतरही अनेकांना कमी मार्क्स पडतात. अशावेळी अनेक विद्यार्थी तणावाखाली येतात. यासाठी निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावे लागणार आहे.

Student
HSC Result : कोकण विभागाची बाजी तर मुंबईचा सर्वात कमी निकाल

अशी असेल पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया

पेपर पुनर्मूल्यांकनाला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.

विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा.

पेपर्स पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायांकीत प्रत मिळणार आहेत.

यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना पुनर्मूल्यांकनाला देता येणार आहे.

Student
Maharashtra HSC Result : मी नापास झालो म्हणून...; नागराज मंजुळेंची पोस्ट पुन्हा चर्चेत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com