जाणून घ्या… ‘क्युआर कोड’मार्फत लोकल पासची प्रक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत येत्या १५ ऑगस्ट पासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा दिली. यासाठी लशींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. मात्र प्रवासासाठी तिकीट प्रणाली आणि ऑनलाइन प्रक्रिया याबाबत अद्याप सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. रेल्वे प्रवासासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पास काढता येणार आहे.
पास काढण्यासाठी आवश्यक क्यूआर कोड मिळवावा लागणार
क्युआर कोडसाठी तीन पद्धतींचा वापर करता येणार
ऑफलाईन
वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल.
ऑनलाईन
बीएमसी प्रशासन आणि रेल्वे प्रशासन मिळून एक अॅप तयार करत आहेत. पुढच्या दोन दिवसांत अॅप तयार होईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. या अॅपवर लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र अपलोड करून क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल.
रेल्वे स्थानकावरही पास मिळणार
एमएमआर परिसरातील रेल्वे स्थानकांवरही लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्युआर कोड देण्याची व्यवस्था उभी केली जाईल. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरु आहे.