Ritesh Deshmukh
Ritesh DeshmukhTeam Lokshahi

रितेश- जेनेलिया वादाच्या भोवऱ्यात, महिन्याभरात 120 कोटींचे कर्ज मंजूर

लातूर एमआयडीसी भागातील भूखंडासाठी 2019 पासून 16 उद्योजक प्रतिक्षेत असताना रितेश आणि जेनेलिया देशमुख यांना मिळाला 10 दिवसात भूखंड, यावरच भाजपने घेतला आक्षेप.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यातील सर्वात प्रेमळ जोडी सर्वाना आवडणारी बॉलीवूड जोडी रितेश आणि जेनेलिया आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.

Ritesh Deshmukh
राष्ट्रवादी काँग्रेसचे 'डी' गॅंग कनेक्शन उघड, राज्याचे राजकारण तापणार

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर MIDC ने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला सोबतच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर 120 कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला, आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा देखील प्रश्न आता निर्माण झाला आहे. यावर लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत. याचा सखोल तपास करावा अशी मागणी देखील भाजपने केली आहे.

Ritesh Deshmukh
ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर कोर्टाचा मोठा निर्णय, समता पक्षाची याचिका फेटाळली

अशी आहे संपूर्ण देश अग्रो प्रा लिमिटेड कंपनीची माहिती

  • कंपनीचे नाव - देश अग्रो. प्रा. लिमिटेड

  • नोंदणी -23 मार्च 2021

  • कंपनीचे भागीदार -रितेश विलासराव देशमुख(50 टक्के), जिनिलिया रितेश देशमुख (50 टक्के)

  • भाग भांडवल- 7.30 कोटी

  • जागा- लातूर एमआयडीसी (16 उद्योजकांना डावलून देशमुखांना भूखंड)

  • जागा मागणीचा अर्ज- 05 एप्रिल 2021

  • जागेची मंजुरी- 15 एप्रिल 2021 ( दहा दिवसात जागा उपलब्ध)

  • जागेचा ताबा 22/07/2021

  • पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेत गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला होता. त्यांनंतर त्यांना 27 ऑक्टोबर 2021 रोजी चार कोटीचे कर्ज मंजूर झाले होते.

  • 05/10/2021 रोजी लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथे दोन वेगवेगळ्या तारखांना कोट्यवधीची कर्ज मंजूर.

  • 27/10/2021 - 61 कोटी रुपये मंजूर

  • 25/07/2022- 55 कोटी रुपये मंजूर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com