तब्बल १ हजार कोटींना विकलं घर

तब्बल १ हजार कोटींना विकलं घर

Published by :
Published on

कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे डळमळीत झाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाउननंतर रिअल इस्टेट क्षेत्र पुन्हा उभारी घेत आहे. मुंबईतील मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. मलबार हिलमध्ये तब्बल 1 हजार कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे.

प्रसिद्ध डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी हे घर विकत घेतलं आहे. ३१ मार्चला हा व्यवहार झाला असल्याचं समजत आहे. राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिलमध्ये १ हजार कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

दमानी कोण आहेत?
राधाकृष्ण दमानी हे डी-मार्टचे मालक आहेत. देशभरात डी-मार्टच्या शाखा आहेत. देशातील किराणा मालासह अनेक वस्तू मिळण्याचं एकमेवं ठिकाण म्हणून डी-मार्टची ओळख आहे. देशभरातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com