Hanumaan Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Hanumaan Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Published by :
Published on

राज्यात हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा हा जयंती उत्सव 27 एप्रिल, 2021 रोजी येत आहे. मात्र कोरोना महामारीमुळे नागरिकांनी नियमाअधीन राहून हि जयंती साजरी करावी लागणार आहे. त्यामुळे गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

  • कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करावा.
  • मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येऊ नये.
  • मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साइट व फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून द्यावी.
  • हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढू नयेत.
  • कोविड रुग्णांच्या संख्येचा विचार करता महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 13 एप्रिल, 2021 च्या आदेशामधील मुद्दा क्र. 1,2,7 व 10 मध्ये नमूद तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी हनुमान जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com