पुणे लोकसभा मतदारसंघाची तातडीने पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निर्देश

खासदार गिरीश बापटांच्या निधनानंतर जागा रिक्त; मुंबई उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. मुंबई हायकोर्टात या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना हायकोर्टानं निवडणूक आयोगाची झाडाझडती घेतली. इतर निवडणुकांमुळं पुण्याची पोटनिवडणूक घेण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचा हास्यास्पद दावा आयोगानं केला. यावर खासदाराच्या निधनानंतर एवढा काळ जागा रिक्त ठेवणं अयोग्य असल्याचे म्हणत कोर्टानं पुण्याची पोटनिवडणूक तातडीनं घेण्याचे आदेश दिले. त्यामुळं येत्या काही दिवसांत पुण्याला त्यांचा हक्काचा खासदार मिळणार आहे. दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com