हिटलरनी जी काम केली तीच मोदी करतायंत…

हिटलरनी जी काम केली तीच मोदी करतायंत…

Published by :
Published on

जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमचं उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अमित शहा यांनी या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखलं जाईल असं जाहीर केलं, मात्र यावर आता विरोधकांकडून मोदींची तुलना थेट हिटलरशी केली जात आहे. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम उभारले आणि त्याला स्वत:चं नाव दिले होतं, अशी टीका पंतप्रधानांवर करण्यात आली

स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.यासह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावने ओळखल जातं होतं मात्र त्याला आता मोदींचं नाव देण्यात आलं आहे. हरियाणातही भारतरत्न सरहदी गांधींचं नाव बदलून वाजपेयींचं नाव देण्यात आलं होतं. नाव बदलण्यात भाजपा हद्द पार करत आहे. आतापर्यंत शहर, जागांची नाव बदलत होते. आता रुग्णालयांचीही नाव बदलण्याची कामं सुरू झाली आहेत अशी टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली.

हे जगातलं सगळ्यात मोठ स्टेडियम आहे. सगळ्यात जास्त आसनक्षमता या स्टेडियममध्ये असून आधुनिक यंत्रण या स्टेडियममध्ये आहेत. मात्र आता या स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव दिल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com