केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून हिंगोलीच्या 108 वर्षीय आजोबांचा फोटो ट्विट
गजानन वाणी, हिंगोली प्रतिनिधी
देशभरासह राज्यभरात कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोग्य विभाग लसीकरण मोहीम राबवत आहे. त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याच चित्र पाहायला मिळतंय तर हिंगोलीच्या शिरडशहापूर येथील 108 वर्षीय उत्तमराव मास्ट यानी काल कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला हा फोटो देशाचे आरोग्य मंत्री मनुसुख मांडवीया यांनी ट्विट करत या आजोबांचं अभिनंदन करत देशातील ज्यां नागरिकांनी लसीकरण केलं नाही त्यांनी लसीकरण करावं असं आवाहन केलं आहे.
देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने लसीकरणाला गती देण्यासाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविली जातेय सोशल मीडियाच्या माध्यमातुन आरोग्य विभाग सतत लोकांना लस घ्यावी आणी स्वताचे संरक्षण करावे असे आव्हान करीत आहे असा परिस्थितीत पुन्हा एकदा लशीकरणं मोहिमेला चालना देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील 108 वर्षीय ऊत्तमराव मास्ट याचा लाशिकरण करतानाचा फ़ोटो केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट केला आहे.