जगातील सर्वात उष्ण शहर चंद्रपूर
एप्रिल महिन्याच्या सुरवातील उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाळ्यात चंद्रपूरात (chandrpur)सूर्य आग ओकत आहे. मार्च महिन्यात पहिल्याच आठवड्यात पारा 37 अंशावर गेला होता. त्यानंतर पारा (temperature)सतत वाढतच गेला. मार्चचा शेवटचा आठवड्यात चंद्रपूर जगातील तिसऱ्या क्रमांकाच उष्ण शहर ठरलं होत. आता चंद्रपूर शहराने जागतिकस्तरावर तापमानात पहिला क्रमांक पटकविला आहे. चंद्रपूरचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सियसवर गेले आहे. (Heat Wave Alert)
गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच मार्च महिन्यात देशात दोन मोठ्या उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. ही जागतिक तापमानवाढीची मोठी झळ असल्याची माहिती ग्रीन प्लान्ट सोसायटीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपने यांनी दिली
राजस्थान व गुजरातसह अन्य राज्यांतील लाटसदृश वातावरणामुळे विदर्भात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत आहे. विदर्भाला यलो अलर्ट जारी (yellow alert )करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २ एप्रिलला देखील अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कशी घ्याल काळजी?
उष्णतेची लाट आल्यानंतर आपण थेट उन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल तर उन्हापासून स्वतःचं संरक्षण करावे.
शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे शरीर थंड राहील.