heat wave
heat wave

विदर्भामध्ये उष्णतेची लाट, पारा 45 अंशाचावर...

Published by :
Saurabh Gondhali
Published on

पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ओसरलेली उन्हाची (summer) लाट अपेक्षेप्रमाणे पुन्हा परतली आहे. सोमवारी विदर्भातील पारा दोन ते चार अंशांनी वाढून वर्धा जिल्हा संपूर्ण देशात हॉट ठरला. हवामान विभागाने आठवडाभर लाटेचा इशारा दिला असल्याने चटके आणखी वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात लाटेने कहर केल्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावाने वैदर्भींना काही दिवस दिलासा मिळाला. मात्र ढगाळ वातावरण नाहीसे होताच पुन्हा सुर्यनारायण (summer) आग ओकू लागला. सोमवारी उन्हाच्या लाटेचा प्रभाव संपूर्ण विदर्भात तीव्रतेने जाणवला. वर्धा येथील तापमानात अडीच अंशांची वाढ होऊन पारा प्रथमच ४५ अंशांवर गेला. येथील कमाल तापमान देशात सर्वाधिक, तर जगात आठव्या क्रमांकावर राहिले.

ब्रम्हपुरी, चंद्रपूर व अकोल्यातही पारा ४४ पार गेला. नागपूरच्या तापमानातदेखील दीड अंशांची वाढ होऊन पारा ४३.६ अंशांवर गेला. प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Department) पाच दिवस येलो अलर्ट दिल्याने उन्हाचा तडाखा या महिन्याअखेरपर्यंत कायम राहणार आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले असून, सूर्यास्तानंतरही उन्हाच्या झळा जाणवत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com