हायस्पीड ट्रेनचे स्टेशन औरंगाबाद रेल्वेस्टेशन जवळ

हायस्पीड ट्रेनचे स्टेशन औरंगाबाद रेल्वेस्टेशन जवळ

Published by :
Published on

हायस्पीड ट्रेनचे स्टेशन हे शहराबाहेर नसून रेल्वेस्टेशन जवळच असणार आहे.याशिवाय याचा डेपोहि औरंगाबादला करण्याचे आश्वासन मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे (एमएनएचएसआर) प्रकल्पाचे सहसरव्यवस्थापक अनिल शर्मा यांनी दिल्याची माहिती मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी दिली.

पर्यावरण संवर्धन,सामाजिक परिणाम,भूसंपादन प्रक्रिया,रेल्वेचा थांबा,या सगळ्या विषयावर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेप्रकल्पाच्या पर्यावरण परिणामाबाबत रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि नागरिकांमध्ये बुधवारी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात चर्चा झाली.

प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पर्यावरण, सामाजिक परिणामासह नागरिक, शेतकऱ्यांचे विचार श्री. शर्मा आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी समजून घेत त्यांच्याशी चर्चा केली. मराठवाडा रेल्वे कृती समितीतर्फे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर त्याचप्रमाणे विश्वनाथ कदम, करमाडचे सरपंच कैलास उकर्डे, टाकळीचे शिवाजी चंदेल आदींनी विविध उपाय सांगत सूचना केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com