Hemant Nagrale | साकिनाका बलात्कार मृत्यूप्रकरणात अॅट्रॅासिटीचा गुन्हा दाखल
सोशल मीडियावर चुकीचा मेसेज पसरवला जातोय. त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी माहिती देतोय. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आपण आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती मिळवली आहे.आरोपीकडे असणारं प्रमुख हत्यारंही आपण जप्त केलं आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत आहे तेवढी मदत केली जाईल.